मुलांच्या आरोग्यासाठीचा हंसा प्रकल्प सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांच्या आरोग्यासाठीचा हंसा प्रकल्प सुरू
मुलांच्या आरोग्यासाठीचा हंसा प्रकल्प सुरू

मुलांच्या आरोग्यासाठीचा हंसा प्रकल्प सुरू

sakal_logo
By

गराडे, ता २४ : शालेय मुलांसाठी पोषणयुक्त अन्न पुरवण्याच्या हेतूने हर्वेस्ट प्लस आणि हॅप्पल फाउंडेशन यांनी एकत्र येऊन ''हंसा'' हेल्थ अँड न्युट्रिशन फोर स्कूल अँड चिल्ड्रेन या उपक्रमास नुकताच जिल्हा परिषद शाळा सोनोरी (ता पुरंदर) शाळेत ''आरोग्य क्लब''चे उद्‌घाटन हार्वेस्ट प्लसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बराल यांच्या हस्ते करण्यात आले.
''हंसा'' ह्या शालेय विद्यार्थांसाठी हा प्रकल्प पुढील दोन महिन्यापर्यंत असणार आहे. दैनंदिन जीवनात पौष्टिक आहाराचा सातत्याने पुरवठा होत राहणे त्याचबरोबर आरोग्याची काळजी जेवणामधील पौष्टिक अन्न काय असले पाहिजे. या सर्व गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे त्याकरिता आरोग्य शाळा उभारण्यात आली. आरोग्य शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता रंगीबेरंगी चित्रे व त्यावरील आरोग्यदायी संदेश काढण्यात आले होते जेणेकरून विद्यार्थी त्याचे अनुकरण करू शकतील.
प्रकल्पाच्या अंतर्गत शाळेमध्ये पुढील तीन महिने लोहियुक्त बाजरीपासून बनवलेले पदार्थ दररोज विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून रोजच्या आहारातील लोहाची कमतरता पूर्ण करता येईल हा यामागील उद्देश आहे. महिला बचत गट व ॲग्रोझी ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेडकडून (भरडधान्य आधारित कंपनी) शालेय आहारात भरड धान्यांपासून बनवलेले पदार्थ देण्यात येत आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारीचे हर्वेस्ट प्लस, अरुण बराल, गट विकास अधिकारी अमर माने, रवींद्र ग्रोवर, बिन्नु सर, स्वाधीन पटनायक, हार्वेस्ट प्लस, प्रतीक अनियाल, शेफ नताशा गांधी, ॲग्रोझीचे संस्थापक महेश लोंढे, मुख्याध्यापिका मनीषा सुरवसे, सरपंच भारत मोरे, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, हेड डॉ. राधिका हेडाव व डायरेक्टर डॉ. संमिता जाधव, प्रमुख नुट्रिशन डॉ कविता मेनन आदी उपस्थित होते.

शालेय मुलांच्या आहारातील पोषण तत्वाचे प्रमाण वाढवून त्यांना संतुलित आहार पुरवणे हा यामागील मुख्य उद्देश होता या प्रकल्पाचा लाभ साधारण दोन दशलक्ष मुलांना मिळेल याची इच्छा तसेच या उपक्रमांतर्गत भरडधान्यपासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश केला जाईल जेणेकरून लोह, झिंक, व्हिटॅमिन अशा अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणातील कमतरता विद्यार्थ्यांच्या आहारामधून भरून काढण्यात यावी. भारताच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही फक्त सोनोरीच नाही तर अशा अनेक शाळांमध्ये उपक्रम राबवण्यास तयार आहोत.
- अरुण बराल, मुख्य कार्यकारी अधिकारी, हार्वेस्ट प्लस

06516