
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करा : गिरमे
सासवड शहर, ता.२७ : सासवड (ता. पुरंदर) येथील जय प्रकाश चौकात शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या जनजागृसाठी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचे आयोजन केले होते.
सासवड शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही. तर डीपी बंद करण्याची धमकी शेतकऱ्यांना दिली जाते. शेतकऱ्यांच्या शेतातून वीज खांब नेले जातात. या वीज खांबाची शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. ती मिळाली पाहिजे. तसेच विद्युत मंडळाकडून विनापरवाना विजेच्या तारेखालील झाडे मुळासकट काढली जात आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या नुकसानीचा देखील विद्युत मंडळाने विचार करावा, असा मुद्दा या वेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. वीज कंपनी मीटर बसविल्यानंतर मीटरचे भाडे वसूल केले जाते. बऱ्याच कालावधी नंतर भाड्यापोटी मीटरची सर्व रक्कम विद्युत मंडळाकडे जमा होते. ही रक्कम पूर्ण जमा झाली असताना या मीटरचे भाडेमात्र आकारले जाते, असे गिरमे यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदिप पोमण, राष्ट्रवादीचे माजी सासवड शहर अध्यक्ष महेश जगताप, भाजपचे सासवड शहर उपाध्यक्ष अमोल जगताप, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक अरुण अप्पा जगताप, व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय चव्हाण, दत्तात्रेय जगताप कोपरगावकर, संभाजी काळाने, मनोहर जगताप, बाळासाहेब वणवे, अशोक बोरावके, ईश्वर बागमार आदी उपस्थितीत होते.
महेश जगताप यांनी सूत्रसंचालन तर अमोल जगताप यांनी आभार मानले.