वनपुरी येथे भावकीत सामना

वनपुरी येथे भावकीत सामना

Published on

गराडे, ता. ३ : वनपुरी (ता. पुरंदर) येथे सरपंचपदासाठी एक व सदस्यपदासाठी सात, अशी निवडणूक सुरू आहे. त्यात माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांच्या पत्नी राजश्री या सरपंचपदासाठी उभ्या आहेत. त्यांनी गावातील समाजातील उमेदवार यांना घेऊन श्री काळभैरवनाथ ग्रामसमृद्धी पॅनेल निवडणुकीत टाकला आहे. तर, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ कुंभारकर यांच्या सूनबाई या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून उभ्या आहेत. राजाभाऊ कुंभारकर यांचे वडील भगवान तात्याबा कुंभारकर यांनी साधारण २५ वर्षे गावचा कारभार केला. हा राजकारणाचा वारसा वसुंधरा संतोष कुंभारकर यांना लाभला आहे. त्या श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून सरपंचपदासाठी लढत आहेत. दोन्ही सरपंचपदाच्या उमेदवारांना मोठा राजकीय वारसा असल्याने या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तसे दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी पक्षाला मानणारे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.