पुरंदर तालुक्यात चार जूनचे वेध

पुरंदर तालुक्यात चार जूनचे वेध

बारामती लोकसभेसाठीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांना चार जूनचे वेध लागले आहेत. ज्या ठिकाणी जाईल तेथे निवडणुकीचीच चर्चा पहावयास मिळत आहे. सासवडमधील रुचिरा कट्ट्यावरील रंगलेली ही चर्चा...
- दत्ता भोंगळे, सासवड शहर

सकाळची वेळ. शिवाजीराजे आले. त्यानंतर पोपटराव यांच्यामागे दत्ताजी, मग उत्तमराव आले. सगळे बसल्यावर पोपटराव यांनी उत्तमशेठची खोड काढली. ‘शेठ होऊ द्या जाऊ द्या चहा...’ ‘का बुवा माझा आज वाढदिवस नाही.’ ‘अहो, शेठ वाढदिवसाचा चहा नाही आम्ही मागत. तुमचा उमेदवार लय जोरात होता. तुमचं बरोबर आहे. फिरून फिरून पार भुगा पडला. आज जरा निवांत वाटतंय.’ तेवढ्यात रामभाऊ तेथे आले. उत्तमशेठ चहा सांगणार आहेत हे रामभाऊला माहितच नव्हतं. तेवढ्यात रामभाऊ पोपटराव डोळा मारुन म्हणाले, ‘गावचे पाटील येथे बसल्यित आणि टेबलला अजून चहा नाही. हे बरोबर नाही.’ अखेर उत्तमशेठला हरभऱ्याच्या झाडावर चढविण्यात सर्वजण यशस्वी झाले आणि उत्तमशेठने मोठ्या रुबात सांगितले. ‘विजय बोत्रेशेठ डोकी मोजा आणि येऊ द्या सगळ्यांना टाईट चहा.’ चहाची ऑर्डर झाल्यावर सगळ्यांनी निःश्वास सोडला. तेवढ्यात पोपटशेठ म्हणाले, ‘कोण पुढे असेल काय अंदाज आहे.? आमच्याकडे सुप्रिया ताईच येतील.’ तर काही जण म्हणाले, ‘नाय नाय. सुनेत्रा ताई आमच्याकडे चांगल्या चालल्यात. खरं पाहिलं तर सुनेत्राताई लोकांच्या तेवढ्या परिचयाच्या नाहीत. त्या हिशोबाने सुप्रिया ताई सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत. त्यामुळे लोकांनी त्याला मतदान केलंय.’ तेवढ्या ईश्वर तेथे आले. ते म्हणाले, ‘’सुनेत्रा वहिनींची ओळख दादांच्या मुळे आहे. पण त्या कोठे कमी पडणार नाहीत.’ तेवढ्यात पोपटराव म्हणाले, ‘चला आपली लागली पैज सुप्रिया सुळेच निवडणूक येतील. कोण निवडून येणार यावर प्रत्येक जण आपल्या प्रथिने जीव तोडून सांगत होता.’ तेवढ्यात एक जण म्हणाला, ‘गावात चंदा वाटप झाले. कोणाला माहीत आहे.’ यावर एकजण म्हणाला, ‘अरे ते पैसे बुथवर काम करणाऱ्या लोकांसाठी असतात.’ तेवढ्या शर्यतीचा विषय बाजूला पडला. समोर आलेल्या चहावर ताव मारत पुन्हा पोपटराव म्हणाले, ‘साठ चाळीस होईल. मग हा मुद्दा सोडण्यासाठी काही पुढे आले. यावेळी दत्ताजी म्हणाले की, ‘सासवड नगरपालिकेला ही आमदार संजय जगताप यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे सासवड शहरात तुतारीचेच वर्चस्व राहिले. यात काही अडचण नाही.’ त्यावर ईश्वर म्हणाले, ‘साठ/चाळीस हाच पॅटर्न राहील. नाही तर मीच पैज लावली असती. आमदारांच्या ताकदीपुढे बाकी यंत्रणा फेल आहे. संजय जगताप सुप्रियाताईंच्या अगदी जवळचे आमदार आहेत.’ तेवढ्यात दिगंबर दुर्गाचे सर तेथे आले. चहा पिऊन झाल्यामुळे सासवड नगरपालिकेचा विषय तेथेच थांबला. पुन्हा चहा कोणी सांगायचा यावर कुटाळ सुरू झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com