पिंपळे येथील विद्यालयाच्या इमारतीची पायाभरणी

पिंपळे येथील विद्यालयाच्या इमारतीची पायाभरणी

गराडे, ता. ११ : पिंपळे (ता. पुरंदर) येथील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे विद्यालय या विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीची पायाभरणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राउंड टेबलचे अध्यक्ष परेश लोढा व अक्षरसृष्टीचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांच्या हस्ते केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते हे होते.

राउंड टेबल ट्रस्ट टेबल नंबर १०५, अक्षरसृष्टी संस्था (एनजीओ) पुणे व आचार्य अत्रे विद्यालय यांच्यावतीने चाळीस लाख रुपयांच्या चार वर्ग खोल्यांचे काम सुरू केले.

यावेळी उद्योजक दर्शन काब्रा, उद्योजक अमित इसरानी, उद्योजक मासूम भाटिया, विजय कोलते, सिद्धनाथ पवार, सचिव शांताराम पोमण,
प्रदीप पोमण, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक, स्कूल कमिटीचे सदस्य परसराम पोमण, उद्योजक प्रवीण पोमण, पोमण ऍग्रो फूडचे संस्थापक महेश पोमण, रामदास पोमण, संतोष पोमण, शिवाजी खेनट, सचिन आटोळे उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यासाठी राउंड टेबल ट्रस्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे असे अध्यक्ष परेश लोढा यांनी सांगितले. अक्षरसृष्टीच्या सहकार्यातून पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक उपक्रम सुरू आहेत. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्यात येईल. दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न जरी असला तरी हे काम गुणवत्ता पूर्ण कसे होईल यासाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे मत अक्षरसृष्टी संस्थेचे अध्यक्ष सिद्धनाथ पवार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सचिव शांताराम पोमण यांनी प्रास्ताविक केले. सचिन धनवट यांनी सूत्रसंचालन केले व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपाली दळवी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com