पुरंदरमधून विधानसभेसाठी 
झेंडे यांच्यासाठी शिफारस

पुरंदरमधून विधानसभेसाठी झेंडे यांच्यासाठी शिफारस

Published on

सासवड, ता. ३० : पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाविकास आघाडीकडे विधानसभेसाठी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना पुरंदरमधून उमेदवारी मिळण्यासाठी एकमुखाने पाठिंबा दिला.
पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांचे अध्यक्षतेखाली २९ जून रोजी पक्ष कार्यालयात झाली. यावेळी याबाबत महाविकास आघाडी योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील यांनी या मागणीला दुजोरा दिला.
यावेळी संभाजीराव झेंडे, बंडूकाका जगताप, तालुका महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, बबन टकले, शेखर पिसे, बळवंत गरुड, संदीप जगताप, मुरलीधर झेंडे, सुधीर झेंडे, अमोल नवले, अमोल कामठे, प्रदीप खळदकर आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.