राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अध्यक्षपदी तानाजी माने

राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या अध्यक्षपदी तानाजी माने

Published on

सासवड शहर, ता. ९ : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये अध्यक्षपदी तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, तर सचिवपदी नंदकुमार सागर यांची बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष - डी. एस घुगरे, सुनील पंडित, सचिन नलवडे, आर. व्ही. पाटील, अधिवेशन अध्यक्ष विजय पाटील, स्वागताध्यक्ष गोपाळ पाटील, सहसचिव : संजय पाटील, मुकेश पाटील, महाराष्ट्र जनरल एज्युकेशन संपादक वामन तर्फे, सह संपादक : रमेश तरवडेकर, प्रसाद गायकवाड, कोषाध्यक्ष - संदेश राऊत, सहकोषाध्यक्ष - गौरव पुनगर, विद्या समिती सचिव - संजयकुमार झांबरे, सहसचिव - अरुण भोईर, हिशोब तपासणीस - ललित चौधरी, सहिशोब तपासणी - नितीन गोरीवले, महिला प्रतिनिधी - उज्ज्वला पाटील, विना दोलवणकर, साधना लोखंडे, पुणे विभागीय अध्यक्ष - रामराव पाडुळे, सचिव - राजेंद्र नलवडे, मुंबई विभागीय अध्यक्ष - अनिल पाटील, सचिव : जयसिंग कदम, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष : अमृत कुमार पांढरे, सचिव : रंगराव तोरसकर, नाशिक विभागीय अध्यक्ष - बी. पी. पाटील, सचिव - उदय तोरवणे. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाषराव माने, अरुण थोरात, अमृत पांढरे, जे. के. पाटील, शांताराम पोखरकर, डी. एस. पाटील, शिवाजीराव किलकिले यांच्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांतून सर्व कौन्सिल सदस्य उपस्थित होते.

तानाजी माने, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नंदकुमार सागर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.