चतुर्मुखी मंदिरात वर्षभर भाविकांची मांदियाळी
दत्ता भोंगळे : सकाळ वृत्तसेवा
गराडे : भिवरी (ता. पुरंदर) पंचक्रोशीचे श्रध्दास्थान ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेले व पर्यटकांसाठी पुण्याहूनजवळ असलेले चतुर्मुखी महादेव मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीवरील असणाऱ्या मंदिरांपैकी उंच डोंगरावर वसलेले, निसर्गाच्या सानिध्यातील हे मंदिर पर्यटकांना भुरळ घालते. यामुळे वर्षभर भाविकांची मंदिरात मांदियाळी असते.
ब्रम्हदेवाने या ठिकाणी तपश्चर्या केल्याने ब्रह्मगिरी म्हणूनही संबोधले जाते. ब्रम्हदेवाच्या कमंडलूमधील पाण्याने कऱ्हा नदीचा उगम झाल्याने कऱ्हा पठार म्हणूनही वेगळी ओळख आहे. अनेक नावांनी प्रसिद्ध श्री चतुर्मुखी महादेव मंदिराचे बांधकाम आणि प्रसन्न वातावरणामुळे याठिकाणी प्रत्येक भाविक मंत्रमुग्ध होऊन जात आहे. पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक, साहित्यिक इतिहास मोठा असून साधू संतांची आणि शूर वीरांची भूमी म्हणून पुरंदरची ओळख आहे.
मंदिराजवळील पर्यटनस्थळे :
मंदिराचे भव्य प्रवेशद्वारावर
भगवान शंकर, माता पार्वती
श्रीगणेश आणि कार्तिकी यांच्या भव्य मूर्ती
मंडपात दगडी शिल्पातील भव्य नंदीचे दर्शन
नाग, डमरू आणि त्रिशूळ यांची दगडामध्ये कोरलेली शिल्पे
मंदिराशेजारील दत्त मंदिर
वर्षभर भाविकांची मांदियाळी
चतुर्मुखी महादेव मंदिरात वर्षभर भाविकांची आणि शिव भक्तांची वर्दळ असते. श्रावण महिन्यातील दर सोमवारी तसेच महाशिवरात्र आणि वर्षभरातील प्रत्येक सोमवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. गावातील आणि विविध भागातील भजनी मंडळांची सेवा येथे पार पडते, अनेक शाळांच्या शैक्षणिक सहली येत असतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी गराडे, भिवरी येथून पालख्या मंदिरात येतात. मंदिर प्रदक्षिणा व देव भेट कार्यक्रमास तालुक्यातून मोठी गर्दी असते.
ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून जे पाणी वाहिले. त्यातील एक प्रवाह मंदिराच्या दक्षिणेकडील गराडे गावच्या जवळ असलेल्या दरेवाडी जवळून वहातो तोच प्रवाह पुढे गराडे गावावरून कऱ्हानदी म्हणून सासवडकडे जातो. या प्रवाहाला या ठिकाणी कऱ्हानदी म्हणून संबोधले जाते. तसेच ब्रम्हदेवाच्या चरणाजवळ सांडलेल्या पाण्यातून चरणावती नदीचा उगम झाला. दोन्ही नद्या वेगवेगळ्या भागातून वाहून सासवड जवळ संगम होतो. या संगमावर प्रसिद्ध संगमेश्वर मंदिर आहे. या दोन्ही नद्यांचा प्रवाह पुढे जेजुरी जवळील नाझरे धरणात मिळतो.
11411, 11413
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.