पुणे
सासवडला भैरवनाथ ट्रस्टतर्फे नवदुर्गांचा सत्कार
सासवड शहर, ता. ९ : सासवड येथील श्री काळभैरवनाथ ट्रस्ट व काळभैरवनाथ उत्सव मंडळाच्या वतीने सनदी लेखापालपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्राजक्ता जगताप तसेच जलसंधारण अधिकारी गट ब या पदावर अश्विनी राठोड यांची निवड झाल्याबद्दल या दोन यशस्वी नवदुर्गांचा सत्कार ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, उत्सव कमिटीचे अध्यक्ष अण्णा क्षीरसागर, रामदास इनामके, राजेंद्र जगताप, संग्राम जगताप, वैभव जगताप, अशोक भोंगळे, उमेश जगताप, विजय जगताप, ट्रस्टचे सचिव विठ्ठलराव शिंदे उपस्थित होते.प्राजक्ता या सासवडचे प्रसिद्ध व्यापारी उमेश जगताप व विजय जगताप यांच्या सूनबाई आहेत.