पुणे
पुरंदर तालुक्यात उद्या पोलिओ लसीकरण
सासवड शहर, ता. ९ : पुरंदर तालुक्यात व सासवडमध्ये रविवारी (ता. १२) सर्व ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. सर्वांनी बूथवर जाऊन बालकांना दोन थेंब पोलिओ लस द्यावी, तसेच जे राहिलेले असतील त्यांना १३ ते १७ ऑक्टोबर या पाच दिवसांत घर भेटीदरम्यान लसीकरण करण्यात येईल. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व बालकांना डोस देण्यात यावा, असे आवाहन आरोग्य अधीक्षक डॉ. गजानन आकमार यांनी केले आहे.