सावता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. शिंदे

सावता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. शिंदे

Published on

सासवड शहर, ता. १९ : सासवड येथील डॉ. अंबिका शिंदे दिवसे यांची सावता परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबाबतचे पत्र सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी यांनी संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मान्यतेने दिले. पुरंदर तालुक्यातील अठरापगड बारा बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्टच्या (राज्य महिला उपाध्यक्ष) माध्यमातून केलेल्या सार्वजनिक कामाची दखल घेऊन डॉ. शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी आमदार संजय जगताप, अठरापगड बारा बलुतेदार चॅरिटेबल ट्रस्टचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, सासवडच्या माजी नगराध्यक्ष लता दिवसे, सासवडचे माजी उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, सासवड भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे आदींनी डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com