सायकल ट्रॅकचे काम पुरंदरमध्ये निकृष्ट दर्जाचे
गराडे, ता. ८ : पुरंदर तालुक्यात सासवड- सुपे- काळदरी, तसेच भोंगवली फाटा- परिंचे, सासवड- कोंढवा व वाल्हे व तालुक्यातील सर्व सायकल ट्रॅकचे काम सुरू असून, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे. तसेच, संबंधित ठेकेदार यांचे थर्डपार्टी तपासणी करावी, असे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पुणे यांना भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस महेश राऊत यांनी दिले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी जीएसबी मटेरिअल माती मिश्रित असून, प्लॅटमिक्स मेथड वापरली गेली नाही. सॉईल स्टॅबिलायजेसनसाठी कोणतेही केमिकल वापरण्यात आले नाही. एमपीएम ७५ एमएम ग्रेडची जाडी दिसून येत नाही. डीबीएमची जाडी अंदाजपत्रकाप्रमाणे केली जात नाही. बीसी, तसेच डीबीएम लेअरचे लेईंग तापमान १६० डीग्रीपेक्षाही कमी आहे. या कामात वापरण्यात येणारे काँक्रिट, डीबीएम, बीसीचा लेअर यांची साइटवर कोअर कटिंग तपासणी केल्याशिवाय तालुक्यातील कोणत्याही कामाचे बिल देण्यात येऊ नये. तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
याबाबत दक्षिण सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता स्वाती दहीवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही
तालुक्यात आंतरराष्ट्रीय सायकल ट्रॅक होत आहे त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, हे काम तसेच रेटून चालू आहे.
- अशोक म्हस्कू कटके, प्रवासी
12213
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

