खानवडीत सावित्रीबाई फुले जयंतीचे आयोजन
सासवड शहर, ता. २६ : महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी (ता. पुरंदर) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारी २०२६ रोजी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्याअनुषगांने गुरुवारी (ता. २५) सासवड (ता. पुरंदर) येथील तुकाईमाता मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली.
भव्य- दिव्य स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या जयंती सोहळ्यानिमित्त भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, निंबकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर पद्मश्री डॉ. अनिल राजवंशी, पुणे झेडपीचे कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, फियाट कंपनीच्या प्रमुख संचिता कुमार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सातही खंडावर स्काय ड्रायव्हिंग करणारी प्रथम महिला पद्मश्री शीतल महाजन, वास्तु विशारद, उद्योजिका प्रतिमा जोशी, आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक सुरेखा यादव, विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती प्रशिक्षक व कुस्तीमधील पीएचडी करणारी पहिली भारतीय महिला डॉ. शबनम शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.
या बैठकीसाठी समता प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद म्हेत्रे, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दत्ता भोंगळे, ॲड. कमलेश म्हेत्रे, वामनराव भोंगळे, बाळासाहेब राऊत, ॲड. बापूसाहेब गायकवाड, संजय चौखंडे, गौरव चौरे, तुकाराम गिरमे आदी उपस्थित होते.
12307
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

