

गराडे, ता.२८ : दिवे (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (ता.३०) ‘सीताफळ आणि अंजीर फळपीक एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर ॲग्रो संवाद चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
सकाळ ॲग्रोवन आणि कृषी विभाग, पुणे आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रोवनच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दिवे येथील श्री कातोबा मंदिरात सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. यासाठी वक्ते म्हणून अंजीर सीताफळ संशोधन केंद्र पुरंदरचे प्रभारी अधिकारी प्रदीप दळवे, अंजीर सीताफळ संशोधन केंद्र पुरंदरचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ युवराज बालगुडे, पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रास शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ॲग्रोवनतर्फे केले आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.