लोंबकळणाऱ्या तारा, विद्युत खांबांच्या दुरुस्तीची मागणी

लोंबकळणाऱ्या तारा, विद्युत खांबांच्या दुरुस्तीची मागणी

गुनाट, ता. २५ : सध्या अवकाळी पावसाचे असलेले वातावरण, सोसाट्याचा सुटणारा वारा, त्यामुळे कोसळणारे विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या तारांचे होणारे घर्षण त्यामुळे ऊस पिकाला आग लागल्याच्या होणाऱ्या घटना या पार्श्‍वभूमीवर महावितरणने विजेच्या खांबांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याची गरज आहे. गुनाट (ता. शिरूर) येथे भोरडे वस्तीवरील अशाच लोंबकळणाऱ्या तारांच्या घर्षणामुळे विजेचे लोळ उडाले, शेजारील उसाच्या शेताच्या बांधावर पडून आग लागली. मात्र येथील शेतकरी नामदेव वडघुले यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तातडीने आग विझविली आणि पुढील अनर्थ टळला. दरम्यान येथील वाकलेले विजेचे खांब दुरुस्त करण्यात यावे यासाठी दोन वर्षांपासून शेतकरी न्हावरे महावितरणकडे सातत्याने पाठपुरवठा करत आहेत. मात्र महावितरणने अद्यापही शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. येथील विद्युत रोहित्राच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा केला जातो. मात्र दोन वर्षांपासून या रोहित्रावरील विद्युत पुरवठा करणारे बहुतांशी खांब वाकलेल्या व कधीही कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. जर वादळी वाऱ्यात हे खांब पडलेच तर संपूर्ण विद्युत रोहित्रच उखडून निघण्याची शक्यता आहे. याच परिसरात सुमारे तीस ते चाळीस एकर उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे आगीची घटना घडलीच तर संपूर्ण ऊस क्षेत्र बाधित होऊन मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.

तिरके झालेले खांब व लोंबकळणाऱ्या तारांच्या घर्षणामुळे कधी उभ्या पिकाला आग लागेल, यामुळे येथील शेतकरी कायम धास्तावलेला असतो. तारांच्या घर्षणामुळे दोन तीन वेळा विद्युत रोहित्रही जळाले आहे, त्याचाही आर्थिक भार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. महावितरणने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करावी.
नामदेव वडघुले, शेतकरी

शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली आहे. इतर ठिकाणीही दुरुस्तीची कामे सुरु आहेत. कामगारांची उपलब्धता झाली की तिरके झालेल्या खांबांची दुरुस्ती केली जाईल.
वैभव पळसकर, उपअभियंता महावितरण, न्हावरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com