देखावे न करता साधेपणाला प्राधान्य
इंदोरी, ता. १ : इंदोरी गावात अकरा दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र, यंदा सर्व गणेश मंडळांनी देखावे न करता साधेपणाला प्राधान्य दिले आहे. तसेच, मिरवणुकीत डीजेचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो खर्च वर्षभरात विविध सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याचा निर्धार मंडळांनी केला आहे.
गावात एकूण १८ सार्वजनिक गणेश मंडळे असून, बहुतांश मंडळांनी फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. काही मंडळांनी धार्मिक कार्यक्रम, भजन सेवा, स्पर्धा व समाजोपयोगी उपक्रमांवर भर दिला आहे.
ग्रामदैवत कडजाई माता मित्र मंडळाचे ५५वे वर्ष असून, अभिषेक शिंदे अध्यक्ष आहेत.
हनुमान मित्र मंडळाचे ५२वे वर्ष असून, दशरथ ढोरे अध्यक्ष आहेत. दररोज भजन सेवेचे आयोजन केले आहे.
ज्योतिबा मित्र मंडळाचे ४०वे वर्ष असून, योगेश चव्हाण व प्रवीण चव्हाण प्रमुख आहेत. मुलांसाठी विविध स्पर्धा घेत आहेत.
इंद्रेश्वर मित्र मंडळाचे ५५वे वर्ष असून, संकेत शिंदे व मुकेश शिंदे प्रमुख आहेत. येथे दररोज भजन सेवा करण्यात येत आहे.
प्रगती मित्र मंडळाचे २७वे वर्ष असून, वैभव ढोरे व बंटी ढोरे प्रमुख आहेत.
धर्मनाथ मित्र मंडळाचे ५१वे वर्ष असून, संदीप ढोरे अध्यक्ष आहेत. दरवर्षीप्रमाणे डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सावता माळी मित्र मंडळाचे १९वे वर्ष असून, अध्यक्ष प्रथमेश शेवकर आहेत.
संत तुकाराम प्रतिष्ठानचे ३०वे वर्ष असून, अध्यक्ष सचिन शेलार आहेत. चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.
इंद्रायणी मित्र मंडळाचे २७वे वर्ष असून, ओंकार कुसाळ अध्यक्ष आहेत.
महाविष्णू मित्र मंडळाचे पाचवे वर्ष असून, रोहित पानसरे अध्यक्ष आहेत. धार्मिक कार्यक्रमांवर भर दिला असून सामुदायिक गणेश याग व अग्निहोत्र विधी करण्यात आली आहे. दररोज भजन सेवा चालू आहे.
शिवशक्ती मंडळाचे ३८वे वर्ष असून, मेघराज काशिद अध्यक्ष आहेत.
मुकाई माता मंडळाचे १५वे वर्ष असून सचिन अवसरे अध्यक्ष आहेत.
संतोषीमाता मंडळाचे १८वे वर्ष असून दीपक केदारी अध्यक्ष आहेत.
कुंडदेवी मित्र मंडळाचे २०वे वर्ष असून, गौरव भेगडे अध्यक्ष आहेत.
कानिफनाथ मित्र मंडळाचे ३२वे वर्ष असून अध्यक्ष खंडुजी गरुड आहेत.
कॅडबरी कामगार मित्र मंडळाचे ४१वे वर्ष असून, सोमनाथ झगडे अध्यक्ष आहेत.
तोलानी मित्र मंडळाचे १५वे वर्ष असून, महेश शिंदे अध्यक्ष आहेत.
साईनाथ मित्र मंडळाचे १६वे वर्ष असून, अक्षय शिंदे अध्यक्ष आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.