पिस्तुलातून गोळी सुटल्याने ‘बर्थडे बॉय’ जखमी

पिस्तुलातून गोळी सुटल्याने ‘बर्थडे बॉय’ जखमी
Published on

इंदापूर, ता.२५ : सराटी (ता.इंदापूर) येथील फार्म हाऊसवर वाढदिवसाच्या निमित्ताने काहीजण पत्ते खेळत होते. हुक्का ओढत वाढदिवस साजरा करीत करताना परवानाधारक पिस्तूल निष्काळजीपणे हाताळणे ‘बर्थडे बॉय’च्याच अंगलट आले. ज्याचा वाढदिवस होता ते सुधीर रावसाहेब महाडीक देशमुख हे छातीत गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सरकारच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक यांनी स्वतः फिर्यादी होत चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत दत्तात्रेय भानुदास लेंडवे पोलिस उपनिरीक्षक इंदापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी (ता.२४) इंदापूर तालुक्यातील सराटी गावच्या हद्दीतील प्रदीप नानासाहेब जगदाळे यांच्या फार्म हाउसमध्ये महाडिक-देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदीप नानासाहेब जगदाळे (रा.सराटी, ता. इंदापूर), सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख (रा.टेंभुर्णी, ता. माढा जिल्हा सोलापूर), विजय शिवाजी पवार (रा.बेंबळे, ता.माढा जिल्हा सोलापूर) आणि राजकुमार दिलीपराव पाटील (रा.अकोले, ता.माढा जिल्हा सोलापूर) हे प्रदीप जगदाळे यांच्या फार्म हाउसवर पत्ते खेळत होते राजकुमार पाटील यांचे परवाना पिस्तूल हे धोकादायक शस्त्र आहे, हे माहीत असतानाही त्याचा निष्काळजीपणे वापर करून, शस्त्र आपापसात हस्तांतर करीत होते. त्यावेळी ते सुधीर रावसाहेब महाडीक देशमुख यांनी धोकादायक पद्धतीने हाताळल्याने स्वतःच्या हातून फायरिंग होऊन गोळी त्यांच्या छातीच्या उजव्या बाजूस लागली व ते स्वतः गंभीर जखमी झाले. तसेच इतरांच्या व्यक्तिगत सुरक्षितेच धोका निर्माण होण्यास कारणीभूत ठरले. दरम्यान, वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शंकर राऊत करत आहेत.

05396

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com