लाखोंचा सिंह झाला जखमी अन् म्हातारा

लाखोंचा सिंह झाला जखमी अन् म्हातारा
Published on

संतोष आटोळे - सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. १६ ः शहरातील जुन्या पुणे- सोलापूर मार्गावरील खुळे चौक येथे श्री क्षेत्र नरसिंहपूर विकास आराखड्यांतर्गत चौक सुशोभीकरण करण्यात आले आहे. या चौकात सिंहाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यासाठी २४ लाख ९५ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. एप्रिल २०२२ मध्ये या शिल्पाचे उद्‍घाटन करण्यात आले होते. मात्र, थोड्याच दिवसांत कामाचा दर्जा चांगला नसल्याने सिंहाची प्रतिकृती ऊन, वारा आणि पाऊस झेलण्यात अपयशी ठरली आहे.
लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सिंहाचा रंग जाणे, टपरे उडणे यामुळे जखम झाल्याचे रूप प्राप्त झाले. सिंहाच्या शिल्पाच्या मागील बाजूस डाव्या पायाला पंजाजवळ भला मोठा काळा डाग पडला होता. सिंहाच्या या प्रतिकृतीचा हळूहळू रंग उडून चालला असून, सिंह अल्पावधीतच म्हातारा होऊ लागल्याचे दिसत आहे. तसेच त्याच्या बाजूने निर्माण केला गेलेला कठडा बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, ते कधी पडेल याची शाश्वती नाही. यामधून प्रतिकात्मक सिंह आजारी पडो अथवा मरो पण अधिकारी आणि ठेकेदार मात्र मालामाल झाल्याचे बोलले जात आहे. (भाग २)

असं म्हटलं जातं की एकदा का भ्रष्टचाराचा भस्मासुर बोकाळला की, तो भस्म केल्याशिवाय राहत नाही. असच काहीसं चित्र इंदापूर शहरातील चौक सुशोभीकरणामध्ये झालेले असावे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. जे काम झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. हे काम जर व्यवस्थित झाले असते, तर चौक सुशोभीकरणासह शहराच्या वैभवातही भर पडली असती.
- शिवाजी शिंदे, अध्यक्ष, युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com