तरंगवाडी तलावातील पाणीसाठ्यात घट
इंदापूर, ता. १२ ः तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील तलावातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा परिणाम या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेली पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहे. यामुळे या तलावात मुळा- मुठा व नीरा डावा कालव्यांतून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.
येथील तरंगवाडी तलाव हा ६८ एमसीएफटी पाणी साठवण क्षमतेचा महत्त्वाचा जलस्रोत आहे. या तलावावर गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, विठ्ठलवाडी, वडापुरी तसेच, इंदापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. या तलावातून १०५ अधिकृत पाणी परवानग्या असून, इंदापूर नगरपालिका, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर दूधगंगा व सोनाई दूध डेअरी अशा संस्थांना पाणीपुरवठा होतो.
मात्र, मागील काही दिवसांपासून संबंधित संस्था व उद्योगांनी पर्यायी पाणी व्यवस्था केल्यामुळे तलावाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त
या तलावात मुळा- मुठा व नीरा डावा कालवा या दोन्ही मार्गांनी पाणी सोडले जाते. मात्र, यंदा अद्याप पाणी आलेले नाही. मे महिन्यात झालेल्या अल्प पावसामुळे तलावात थोडा पाणीसाठा झाला असून, यामुळे ऊस, मका, कडवळ, डाळिंब, केळी यांसारखी पिके सध्या जिवंत आहेत. मात्र, पावसाचा अभाव व पाणीसाठ्याची कमतरता पाहता पुढील काही दिवसांत पाणी न मिळाल्यास पिके जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने तलावात पाणी सोडण्याबाबतची कार्यवाही करण्याची मागणी नितीन गोफणे, भारत वाघमोडे, बापू पोळ, अनिल चितळकर, राजू मकर, अप्पा शिंदे, अतुल झगडे, दिलीप भोंग, सुहास बोराटे, नवनाथ डाके, आजिनाथ ठोंबरे, संदीपान पोळ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
तरंगवाडी तलावातील पाणी साठा कमी झाला असून, आताच तलावात पाणी सोडणे आवश्यक आहे. पाणी सोडण्याचा निर्णय उशिरा घेतला, तर परिसरातील ऊस, मका, फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल.
- नितीन गोफणे, अध्यक्ष, भैरवनाथ पाणी वापर संस्था, तरंगवाडी
05953
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.