इंदापुरात आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

इंदापुरात आरोग्य सेवेचा उडाला बोजवारा

Published on

संतोष आटोळे
इंदापूर, ता. ५ : शहरासह तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडालेला आहे. याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सूचना करूनही आरोग्य व्यवस्थेबाबत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या सूचनांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
उपजिल्हा रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाची लिफ्ट बंद आहे. यामुळे अत्यंत गंभीर आणि ज्येष्ठ रुग्णांनाही तीन तीन मजले पायी चढावे लागत आहेत. यामुळे रुग्णालयात आल्यानंतर वेदना कमी होण्याच्या ऐवजी वाढत आहेत.तसेच या ठिकाणी कायम सेवेत असलेल्या डॉक्टर यांची नियमित उपस्थिती नसतात. स्वतःच्या रुग्णालयामध्ये २४ तास उपलब्ध असा फलक लावलेले असताना शासकीय पगार घेणारे डॉक्टर आपणास नेमून दिलेल्या शिफ्टमध्येही दवाखान्यात पाहायला मिळत नाहीत. तर रुग्णसेवेचा सर्व भार हा कंत्राटी आणि शिकाऊ डॉक्टर पार पाडत असल्याचे पाहायला मिळाले.


औषधांचा तुटवडा कायम
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयासह संपूर्ण तालुक्यातील शासकीय दवाखान्यामध्ये औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहे. या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता जिल्हास्तरावरूनच औषधांचा पुरवठा मागणीप्रमाणे होत नसल्याने अडचणी निर्माण, अशी माहिती समोर आहे यामुळे याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाने औषधांचा पुरवठा मागणी प्रमाणे करणे गरजेचे असून जेणेकरून रुग्णांना औषधांची टंचाई जाणवणार नाही.

वीज पुरवठ्याचा प्रश्न गंभीर
लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर अचानक वीजपुरवठा खंडित झाला तर आपत्कालीन व्यवस्था नाही याचे उदाहरण म्हणजे उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या शवविच्छेदनगृहात जर अचानक वीज गेली तर सर्व कामकाज ठप्प होते किंवा मोबाइलच्या टॉर्चवर कामकाज करावे लागेल याबाबत ही प्रशासनाने योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे.

स्वच्छतेचा गंभीर प्रश्न
उपजिल्हा रुग्णालयातील अंतर्गत भागासह परिसरामध्येही प्रचंड अस्वच्छता पसरली असून झाडे झुडपाची वाढ झाली आहे या स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे आजार कमी होण्याऐवजी बळावत आहेत.

06567

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com