इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू

इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू

Published on

इंदापूर, ता. ६ ः नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली असून, जनतेतून नगराध्यक्ष आणि १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करून त्याची प्रत नगरपालिका कार्यालयात दाखल करावयाची आहे.
इंदापूर नगरपरिषद ही ‘क’ वर्ग नगरपालिका असून, यंदा नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणसाठी असल्याने राजकीय पक्षांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड होणार आहे. दहा प्रभागांमधून २० सदस्य निवडले जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज भरू शकणार आहेत, तर नगरपरिषद कार्यालयात १० ते १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) उमेदवारी अर्ज प्रत्यक्षात स्वीकारले जाणार आहेत. उमेदवारी अर्जांची १८ नोव्हेंबर रोजी दाखल छाननी होऊन वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रकाशित केली जाणार आहे. उमेदवारी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मागे घेता येणार आहेत. तर २६ नोव्हेंबर रोजी चिन्हवाटप करून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.

आचारसंहितेचे पालन करा
नगरपरिषद निवडणुकीसाठी शासकीय आचारसंहिता लागू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांसह उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी केले आहे.

वर्षभरात ३६२ मतदारांची वाढ
गेल्या वर्षी पार पडलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत इंदापूर शहरात २४ हजार ४६७ मतदार होते. यामध्ये १ जुलै २०२५ अखेर ३६२ मतदार वाढले आहेत. यंदाच्या नगरपालिका निवडणुकीसाठी मतदारसंख्या २४ हजार ८२९ इतकी झाली आहे.

इंदापूर नगरपरिषद निवडणूक घोषवारा
एकूण मतदार- २४,८२९
नगराध्यक्ष- १ थेट जनतेतून
प्रभाग संख्या- १०
निवडून द्यायची सदस्य संख्या - २०
एकूण मतदान केंद्र- २७
मतदान - २ डिसेंबर २०२५
मतमोजणी - ३ डिसेंबर २०२५

06580

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com