‘पारंपरिक ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे शाश्वत शेती’

‘पारंपरिक ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे शाश्वत शेती’

Published on

इंदापूर, ता.१० : ‘‘पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम म्हणजे शाश्वत शेती आहे. कार्यशाळांमध्ये शेतकऱ्यांना शाश्वत शेतीविषयी तसेच त्या माध्यमातून माध्यमातून शेती क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक पद्धती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी होणाऱ्या उपक्रमांची माहिती मिळते,’’ असे मत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.

कालठण (ता.इंदापूर) येथे शाश्वत शेती कार्यशाळा आणि प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्यावेळी भरणे बोलत होते. कार्यशाळेचे आयोजन रोटरी डिस्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट अव्हेन्यू यांच्या पुढाकाराने व रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि जिजाऊ इन्स्टिट्यूटच्या वतीने केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे यांनी भूषविले.
माजी प्रांतपाल प्रमोद कुमार जेजुरीकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत शमनोहर हके (पाणी व्यवस्थापन), प्रा.भास्कर गटकुळ (झिरो बजेट शेती), संतोष लाटणेकर (मातीचे आरोग्य व पर्यावरण) आणि डॉ. रवींद्र बनसोड (पर्यावरणपूरक शेती), राजेंद्रकुमार सराफ यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी इंदापूरसह परिसरातील सर्व गावांमधून तसेच करमाळा, माढा आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबचे रविकिरण खारतोडे, नितीन शहा, ज्ञानदेव डोंबाळे, दीपक शासम, निखिल भोगावत तसेच रोटरी सदस्यही उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिजाऊ इन्स्टिट्यूटचे शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थापिका प्रा.जयश्री गटकुळ, सचिव विश्वबाला गटकुळ व प्राचार्या राजश्री जगताप सहकार्य केले. गोविंद जगदाळे यांनी प्रास्ताविक तर भरत चव्हाण यांनी स्वागत केले. शशांक भूमकर व सुभाष वाल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले.

रोटरी शाश्वत शेती पुरस्काराचे मानकरी
शाश्वत शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विजयसिंह बालगुडे (वरकुटे), अजिनाथ कचरे (गलांडवाडी), भास्कर पाडुळे (करेवाडी), सचिन सातव (राजवडी), विराज जाधव (कालठण), सोमनाथ वाळके (पांढरेवाडी), रोहन टोणपे (शिराळ), दिगंबर खानट (कंदर), विनोद तळेकर (केम) यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
06598

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com