इंदापूरच्या सत्तेची चावी महिलांच्या हाती
इंदापूर, ता. १८ : इंदापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या अंतिम मतदारसंख्येनुसार शहराच्या राजकारणात महिलांचे वर्चस्व अधिक स्पष्ट झाले आहे. एकूण दहा प्रभागांपैकी तब्बल आठ प्रभागांमध्ये मतदार संख्येत महिलांनी पुरुषांपेक्षा निर्णायक आघाडी घेतली असून, केवळ दोन प्रभागातच पुरुष मतदारांची संख्या अल्प प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे इंदापूर नगरपरिषद निवडणुकांमध्ये सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती असल्याचे चित्र अधिक ठळकपणे समोर आले आहे.
इंदापूर नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या अंतिम यादीनुसार एकूण मतदारसंख्या २४ हजार ८२९ आहे. त्यामध्ये महिलांची संख्या १२ हजार ६३४, पुरुष मतदारांची संख्या १२ हजार १८८ व इतर ७ मतदार आहेत. यामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ४४६ने अधिक आहे.
या आकडेवारीनुसार महिलांची मते मिळविल्याशिवाय विजयाची समीकरणे साध्य होणार नाहीत, हे उमेदवारांना स्पष्टपणे लक्षात ठेवावे लागणार आहे. त्यामुळे इंदापूरच्या मतदानाच्या रणांगणात आता स्त्रीशक्तीचं वर्चस्व स्पष्टपणे दिसत आहे. महिला मतदारांचे हे वाढते वर्चस्व इंदापूरच्या राजकीय चित्रात मोठा बदल घडवू शकते. नगरपरिषदेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे प्रामुख्याने महिलांच्या मतदानावर अवलंबून राहणार आहे.
एकूण मतदारसंख्या- २४ हजार ८२९
महिला मतदारसंख्या- १२ हजार ६३४
पुरुष मतदारसंख्या- १२ हजार १८८
इतर मतदार- ७
पुरुषांपेक्षा जास्त महिला मतदारसंख्या- ४४६
महिलांच्या संदर्भातील प्रचाराचे मुद्दे
- महिला सुरक्षेचे प्रश्न
- आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित सुविधा
- शिक्षणाची उपलब्धता
- स्वावलंबन व उद्योजकतेसाठीच्या योजना
- स्थानिक पातळीवरील दैनंदिन समस्या
- महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उपलब्धता
इंदापूर नगरपरिषदेतील मतदारसंख्या
प्रभाग क्रमांक – पुरुष मतदार – स्त्री मतदार – इतर – एकूण
१) १०२० – १००६ – ० – २०२६
२) ८९० – ९८७ – ० – १८७७
३) १२६४ – १२१५ – ० – २४७९
४) १२४४ – १३२० – ० – २५६४
५) ९५५ – ९५६ – १ – १९१२
६) १४०८ – १५२८ – ० – २९३६
७) १२३७ – १३०६ – ३ – २५४६
८) १२८२ – १३८३ – ० – २६६५
९) १३५६ – १३८६ – २ – २७४४
१०) १५३२ – १५४७ – १ – ३०८०
एकूण – १२१८८ – १२६३४ – ७ – २४८२९
–
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

