विवाह सोहळ्यातून मतदानाचे आवाहन
इंदापूर, ता. २६ : आगामी इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीला अधिक व्यापक, सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी स्वीप (SVEEP – Systematic Voters’ Education and Electoral Participation) अंतर्गत इंदापूर नगरपरिषदेतर्फे विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुरूप शहरातील चव्हाण व गाडेकर यांच्या शुभविवाहप्रसंगी विवाह होत असलेल्या दांपत्याने सर्व नागरिकांना लोकशाहीतील अनमोल हक्क असलेल्या मतदानाचा जरूर वापर करण्याचे आवाहन केले.
शहरातील सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक महादेव चव्हाण यांच्या कन्या डॉ. भाग्यश्री आणि बारामती येथील सतीश गाडेकर यांचे चिरंजीव डॉ. शुभम यांचा शुभविवाह इंदापूर येथे संपन्न झाला. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत या नवदांपत्याने आपल्या विवाह सोहळ्यातूनच सर्व नागरिकांना लोकशाहीतील अनमोल हक्क असलेल्या मतदानाचा जरूर वापर करण्याचे आवाहन करत निवडणूक प्रक्रियेत सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. हा उपक्रम इंदापूर नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर मागाडे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या उपक्रमांतर्गत नवविवाहित दांपत्याकडून दिलेला हा जनजागृती संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला असून, इंदापूर शहरातील आगामी निवडणुकीत मतदार सहभाग वाढविण्यासाठी ही कृती सकारात्मक दिशा देणारी ठरली आहे. यावेळी नगरपरिषद निवडणुकीतील अधिकारी स्वप्नील हाके, सुभाष ओहोळ यांच्यासह प्रसाद देशमुख, सचिन होलंबे, सुरेश सोनवणे, मनोज भापकर, अल्ताफ पठाण, अरुण शिंदे यांच्यासह चव्हाण आणि गाडेकर कुटुंबीय या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.
6673
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

