इंदापुरातील ऊस उत्पादकांना अच्छे दिन
इंदापूर, ता.८ : इंदापूर महात्मा फुले नगर बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड सहयोग ओंकार शुगर अॅन्ड डिस्टीलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड युनिट ११ या कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम २०२५-२६ साठी पहिला हप्ता ३२०० रुपये तसेच दिवाळी सणासाठी १५० रुपये असा एकूण ३३५० रुपये दर जाहीर केला आहे.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सहयोग तत्त्वावर पहिला प्रयोग इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व ओंकार शुगर लिमिटेड यांच्या वतीने यंदा सुरू करण्यात आला. मोळी टाकण्याच्या कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगर लिमिटेडचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुरूप सन २०२५-२६ च्या ऊस गाळपास प्रतिटनासाठी ३३५० रुपये ऊस दर जाहीर केला आहे. यातील पहिला हप्ता ३२०० तर उर्वरित १५० रुपये दिवाळीला दिले जाणार आहेत. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
याबाबत व्यवस्थापनाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना हंगाम मध्ये गळीतास आलेल्या उसाच्या टनेजनुसार कारखाना धोरणाप्रमाणे दीपावली सणानिमित्त मोफत साखर वाटप करण्यात येणार असल्याचेही नमूद केले आहे.
दरम्यान, कारखान्यास ऊस पुरवठादार शेतकरी यांचे सहकार्य आणि विश्वास नेहमीच कारखान्यासोबत आहे. यापुढेही कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास तत्पर राहील.असेही व्यवस्थापनाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
06775
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

