गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश

गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश

Published on

इंदापूर, ता. १७ : ‘‘भाजप हा एक विचार आहे आणि या विचाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आमचे संस्कार आहेत. त्याच संस्कारात कार्यकर्ते घडविण्याचा प्रयत्न असून, येणाऱ्या काळात राष्ट्र प्रथम यामध्ये कोणतेही तडजोड न करता काम करून पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला अभिमान वाटेल असे पक्ष संघटन करून दाखवू,’’ अशी ग्वाही प्रदीप गारटकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह इंदापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले नगरसेवक आणि इंदापूर शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार सुरेश खाडे, युवा नेते प्रवीण माने, जिल्हाध्यक्ष शेखर वडणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी विठ्ठल ननवरे, राजेश शिंदे, अतुल शेटे पाटील, नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार, नगरसेवक गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीम बागवान, नवाब बागवान, अविनाश मखरे, सुनील राऊत, दादा सोनवणे, प्रभाकर खाडे, वैभव जाधव, श्रीकांत दंडवते, महेश जठार, उमेश क्षीरसागर, समीर देशमुख, हुसेन मुलाणी, गोरख पवार, इमरान शेख, नौशाद मुलाणी,संदीप चव्हाण, दादासाहेब जगताप, दादासाहेब बागल, संतोष देवकर, अहमदरजा सय्यद, शमसुद्दीन शेख, सुनील अडसूळ, दत्तात्रय शेलार, रुपेश सोनी, साजन ढावरे, विकास जाधव, नरेंद्र शिंदे, बंडा पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com