पुरंदरमधील निवडणुका भाजप सक्षमपणे लढविणार

पुरंदरमधील निवडणुका भाजप सक्षमपणे लढविणार

जेजुरी, ता. २ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम जेजुरी येथे बूथ प्रमुख सचिन पेशवे यांच्या माध्यमातून आयोजित केला होता. यावेळी झालेल्या बूथ बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप सक्षमपणे लढविणार असल्याचे पक्षाचे नेते बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले.
तालुक्यातील जनतेच्या अजूनही अनेक समस्या शासकीयस्तरावर प्रलंबित आहेत. प्रशासनातील काही अधिकारी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्याऐवजी त्यांना हेलपाटे मारायला लावत आहेत. त्यासाठी प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी सासवड येथील कार्यालयामध्ये जनता दरबार घेणार असून, त्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील, तसेच आताच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी पुरंदर तालुक्यामध्ये भाजपच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आला. त्या सर्व कामांची पाहणी, तसेच त्याची गुणवत्ता तपासणी करणे, तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, गावातील अडी अडचणी जाणून घेण्यासंदर्भात, तसेच विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद
गटनिहाय घोंगडी बैठकींचे आयोजन करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

यावेळी भाजप तालुका कामगार आघाडीचे अध्यक्ष विलास घाटे यांची कोळविहिरे गावच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जगताप, प्रदेश ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष सचिन लंबाते, शहराध्यक्ष सचिन पेशवे यांची भाषणे झाली. यावेळी संजय काका निगडे, श्रीकांत थिटे, ॲड. विश्वास पानसे, बाळासाहेब भोसले, मोहन काका भैरवकर, अशोक जोशी, अलका शिंदे, आनंद जगताप, मयूर जगताप, संदीप नवले, सुखदेव बरकडे, नवनाथ बरकडे, योगेंद्र अण्णा माने, पंकज घोणे आदी उपस्थित होते. श्रीकांत ताम्हाणे यांनी सूत्रसंचालन केले. शहर कार्याध्यक्ष गणेश भोसले यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com