जेजुरी येथे पांडेश्वर संस्थेतर्फे वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरी येथे पांडेश्वर संस्थेतर्फे वृक्षारोपण
जेजुरी येथे पांडेश्वर संस्थेतर्फे वृक्षारोपण

जेजुरी येथे पांडेश्वर संस्थेतर्फे वृक्षारोपण

sakal_logo
By

जेजुरी, ता. ८ : येथील (ता. पुरंदर) वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्था पांडेश्वर या संस्थेतर्फे पांडेश्वर येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशी रोपांची लागवड करण्यात आली.
वृक्षलागवडीचे अनेक फायदे असल्याने वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्था या संस्थेने वृक्षारोपण करणे व त्याची जोपासना करण्याची
जबाबदारी घेतली आहे. पांडेश्वर परिसरात यापूर्वी संस्थेच्या वतीने अनेक वेळा वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे परिसर हिरवा झालेला दिसत आहे. या कामात कडेपठार पतसंस्थेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे यांची मदत झाल्याचे संस्थेचे सचिव रियाज शेख यांनी सांगितले. छोट्या रोपांची लागवड करण्यात आली असून, त्यांची देखभालही करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्या सामाजिक कामाचे माणिकराव झेंडे यांनी कौतुक केले. यावेळी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे व शिवशंभो तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

01882