सुप्रिया सुळे यांची
जेजुरीत प्रचारफेरी

सुप्रिया सुळे यांची जेजुरीत प्रचारफेरी

जेजुरी, ता. २५ : बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जेजुरीत प्रचारफेरी काढली होती. खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर त्यांनी भंडारा उधळत दर्शन घेतले. तसेच, मतदारांशी संपर्क साधला.
जेजुरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचारफेरीचा प्रारंभ केला. यावेळी आमदार संजय जगताप, संभाजी झेंडे, विजय कोलते, सुदामराव इंगळे, दिलीप बारभाई, राष्ट्रवादी माणिकराव झेंडे, प्रदीप पोमण, हेमंतकुमार माहूरकर, दत्ता चव्हाण, जयदीप बारभाई, सचिन सोनवणे, डॉ. रामदास कुटे, सुनील असवलीकर, एन. डी. जगताप, प्रशांत लाखे, राहुल घाडगे, किरण दावलकर, राजू शेवाळे, श्‍याम माने, संतोष खोमणे, ईश्वर दरेकर आदी प्रचारफेरीत सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com