जेजुरीत दोघांवर गुन्हा दाखल

जेजुरीत दोघांवर गुन्हा दाखल

जेजुरी, ता.१४ : जेजुरी शहरामध्ये गेली वर्षभरापासून देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पॅराग्लायडिंगद्वारा (पॅराशूट) जेजुरी शहर, गडकोट व जयाद्री डोंगररांगेची हवाई सफर घडविण्याचा व्यवसाय करणाऱ्या फ्लाईंग रिनो पॅरामोटरिंग सेंटरचे मालक नीता प्रशांत काकडे व चालक चंद्रकांत लक्ष्मण महाडीक या दोघांवर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दुर्घटनेतील जखमी युवती आस्था प्रदीप माने (रा.वाकड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पॅराग्लायडर चालक चंद्रकांत महाडीक यांनी रविवारी (ता.१२) सायंकाळी साडेपाच वाजता आस्था माने यांना पॅराग्लायडरमध्ये (पॅराशूट) बसवून आकाशामध्ये उड्डाण केले होते. अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ५००ते ६००फूट उंचीवर असतानाच पॅराग्लायडर मध्यवस्तीमध्ये एका पत्र्याच्या घरावर कोसळले. यामध्ये फिर्यादी आस्था माने या गंभीर जखमी तर चालक महाडीक हे किरकोळ जखमी झाले होते तर घराच्या पत्र्याचे छत कोसळले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com