

जेजुरी, ता. ९ : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिर व गडकोटाला राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाच्या पुरातत्त्व खात्याने घोषित केला आहे, अशी माहिती श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने दिली. राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा घोषित झाला असल्याने जेजुरी गड विकासाला चालना मिळणार आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून जेजुरीचा खंडोबा देशभर प्रचलित आहे. वर्षभरात खंडोबा देवाच्या आठ ते दहा यात्रा भरतात. यावेळी लाखो भाविक यात्रेला येतात. दररोज हजारो भाविक येथे देवदर्शन व कुलधर्म कुलाचार करण्यासाठी दररोज येत असतात. वर्षभरात सुमारे एक कोटी भाविक विधीसाठी व धार्मिक पर्यटनासाठी येथे येत असतात.
महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केला असून यासाठी ३४९ कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. यापैकी सुमारे १०९ कोटी रुपयांची विकास कामे पहिल्या टप्प्यात सुरू आहे.
जेजुरी गडकोट हे संपूर्ण राज्यस्तरावर राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासन निर्णयानुसार २४ ऑक्टोबर २००२ रोजी राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलेले आहे. मात्र, निर्णयाची अधिकृत घोषणा झाली नव्हती. याचे अधिकृत पत्र महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय विभागीय कार्यालय पुणेचे संचालक डॉ .विलास वाहने यांनी
८ एप्रिल ३०२५ रोजी श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीच्या विश्वस्त मंडळाला दिले आहे.
श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने ही माहिती पालखी सोहळा खांदेकरी मानकरी, नित्य सेवेकरी, पुजारी सेवकवर्ग आदींना दिली. यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, अनिल सौंदडे, ॲड. विश्वास पानसे, व्यवस्थापक संदीप जगताप, आशिष बाठे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, बापू सातभाई, माधव बारभाई, सचिन मोरे, भाग्येश बारभाई, जेजुरी शहर भाजपचे
अध्यक्ष गणेश भोसले आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.