जेजुरीत एकही केंद्र संवेदनशील नाही

जेजुरीत एकही केंद्र संवेदनशील नाही

Published on

जेजुरी, ता. १ : जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नगराध्यक्ष व १० प्रभागांतून २० नगरसेवकांसाठी निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. जेजुरी शहरात संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्र नाही. येथील निवडणूक शांततेच्या व खेळीमेळीच्या वातावरणात होत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
शहरातील अहिल्यादेवी विद्यामंदीर, ईरा किड्स, टेक्निकल स्कूल, जिल्हा परिषद मुलांची-शाळा, जुनी जेजुरी, अग्निशमन केंद्र, जिजामाता विद्यालय व नगरपालिकेच्या शेजारील आरोग्य वर्धिनी केंद्र आदी ठिकाणी २० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. मतदान जनजागृतीसाठी चौका चौकात बॅनर लावण्यात आले आहेत. शाळा महाविद्यालयातून रॅली काढण्यात आली आहे. आचारसंहिता देखरेख करण्यासाठी तीन एस.एस.टी.पथके, दोन फिरते पथके, चित्रीकरण करणारे एक पथक नेमण्यात आले आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी व्हीलचेअर, रॅम्प आदी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चेतन कोंडे यांनी दिली. संपूर्ण निवडणुकीचे कामकाज पाहणारे प्रमोद भापकर, बाळासाहेब खोमणे, नागनाथ बिराजदार, सुनील ताजवे, प्रवीण भुई, तेजस बोरकर हे निवडणूक कामाचे नियोजन करीत आहेत. सोमवारी (ता. १) सकाळी निवडणूक कर्मचाऱ्यांना तिसरे प्रशिक्षण देऊन साहित्य वाटप करण्यात आले. कर्मचारी वर्ग मतदान केंद्र सज्ज करीत आहेत.

एक पिंक, एक आदर्श मतदान केंद्र
जेजुरी शहरातील वीस मतदान केंद्रापैकी जिजामाता विद्यालयातील एक केंद्रात सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या केंद्राची पिंक केंद्र म्हणून वेगळी ओळख देण्यात आली आहे. तर जेजुरी नगरपालिकेच्या शेजारी आरोग्यवर्धिनीची नवीन इमारत तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रावर फुग्यांची सजावट करण्यात आली आहे. हे केंद्र आदर्श केंद्र म्हणून साकारले आहे.

मतदार :
पुरुष : ७५८३
महिला : ८२१५
इतर : २
एकूण : १५८००

पोलिस अधिकारी, कर्मचारी : १५०
बंदोबस्तासाठी : ७५ पोलिस तैनात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com