ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू

ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू
Published on

जेजुरी, ता. २६ : बेलसर (ता. पुरंदर) येथील वाडा ॲग्रो मशरूम कंपनीतून येणाऱ्या सांडपाण्याच्या ड्रेनेजची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.२६) दुपारी साडेचार वाजता घडली.

पिंटू राजेश प्रसाद (वय २३, रा. खोराराम), व्यास सोहम कुमार (वय २२, रा. नवतम), गौतम रामसूरन कुशवाहा (वय ३६, रा. मेदनापूर, ता. रुद्रपूर, सर्वजण जि. देविरया, उत्तरप्रदेश) या तिघांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कामगार स्वच्छतेसाठी टाकीत उतरला होता. मात्र तो लवकर वर येत नाही हे पाहून दुसरा खाली उतरला. त्यानंतर ते दोघेही वर येत नाहीत म्हणून पुन्हा तिसरा कामगार टाकीत उतरला. दरम्यान, तिघेही वर येत नसल्याचे हे पाहून शेजारील काहीजणांनी तत्काळ जेसीबीच्या साह्याने ड्रेनेजवरील स्लॅब फोडून त्यांना बाहेर काढले. या तिघांना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. हे कामगार टाकीतील साठलेल्या गॅसमुळे गुदमरून जागेवरच बेशुद्ध पडून मृत्यू झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तिघांचे शवविच्छेदन सुरू आहे. त्यांच्या मृत्यूबाबत तपास सुरू केला आहे, असे जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले.

03781

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com