ऋचा उंडे राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋचा उंडे राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवी
ऋचा उंडे राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवी

ऋचा उंडे राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवी

sakal_logo
By

जुन्नर, ता. ६ : शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या ऋचा रामदास उंडे या विद्यार्थिनीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ५ वी) २९८ पैकी २८८ गुण मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवे व जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळविले आहे. शाळेच्या एकूण ११ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये संस्कृती विजय अरगडे (२७८ गुण), श्रेयस हेमंत वर्पे (२७० गुण), आर्यन राहुल घोडके (२६६ गुण), शुभम महेंद्र देशपांडे (२५० गुण), हितेश उत्तम विधाटे (२३२ गुण ), आदिती महेंद्र देशपांडे (२२६ गुण), क्षितिजा दत्तात्रेय उगले (२१० गुण) व सृष्टी शिवशंकर शेटे (२१० गुण) यांनी शहरी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांना हेमंत वर्पे, अविनाश कडाळे व सरिता कलढोणे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता ८वी) गौरी सुमंत मेहेर (२१२ गुण) व समृद्धी अजित शिंदे (२१२ गुण) यांनी शहरी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या विद्यार्थ्यांना विनायक रावळ, नीलेश काशीद, प्रफुल्ल बोऱ्हाडे, अभिजित पाटील व स्मिताली चव्हाण या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.