बापूजी ताम्हाणे यांना ‘छंदवेध’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापूजी ताम्हाणे यांना ‘छंदवेध’ पुरस्कार
बापूजी ताम्हाणे यांना ‘छंदवेध’ पुरस्कार

बापूजी ताम्हाणे यांना ‘छंदवेध’ पुरस्कार

sakal_logo
By

जुन्नर, ता. ८ : गोळेगाव (ता.जुन्नर) येथील पुरातन वस्तू संग्राहक बापूजी खंडू ताम्हाणे यांना संग्राहक दिनकर (काका) केळकर ‘छंदवेध’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक संचालक पद्मश्री दिनकर गंगाधर ऊर्फ काका केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार शुक्रवारी (ता. ६) पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात ताम्हाणे यांना मूर्तीशास्त्र अभ्यासक पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते देण्यात आला. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, चांदीचा दिप, कविता संग्रह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. मंजिरी भालेराव तसेच पुरातत्त्वतज्ज्ञ मंडळी यावेळी उपस्थित होते.
बालगंधर्व (पुणे) : ‘छंदवेध’ पुरस्कार स्वीकारताना बापूजी ताम्हाणे.