लेण्याद्रीला गुरुवारपासून गणेश जयंतीचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेण्याद्रीला गुरुवारपासून 
गणेश जयंतीचे कार्यक्रम
लेण्याद्रीला गुरुवारपासून गणेश जयंतीचे कार्यक्रम

लेण्याद्रीला गुरुवारपासून गणेश जयंतीचे कार्यक्रम

sakal_logo
By

जुन्नर, ता. १८ : श्री गणेश जयंतीनिमित्त श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गुरुवारपासून (ता. १९) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पहाटे काकडा, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन होणार असून, अखंड हरिनाम सप्ताहात संतोष बढेकर, शिवलीला पाटील, चंद्रकांत खळेकर, शंकर शेवाळे, अनिता जाधव, नीलेश कोरडे, दत्ता दोन्हे यांची कीर्तने होणार आहेत. श्री गणेश जयंतीला बुधवारी (ता. २५) मंदिरात सकाळी नामदेव महाराज वाळके यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन होणार असून. गुरुवारी (ता. २६) पारस मुथ्था यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.