शिवछत्रपती महाविद्यालयाच्या
१७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

शिवछत्रपती महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

Published on

जुन्नर, ता. ९ : मेटारोल इस्पॅट कंपनीच्या सीएसआर फंडातून येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या १७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे एकूण ८५ हजार रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. व्ही. उजगरे, संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही. बी. कुलकर्णी व मेटारोल कंपनीचे अधिकारी राम शिंगणे, शुभम झालटे, अजित जोशी, विनय वाबळे, राहुल गोंधळे, संतोष नवले, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयातील गरीब, आदिवासी व होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मेटोरोल कंपनीचा उपक्रम निश्चित कौतुकास्पद असल्याचे
उपप्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी माजी विद्यार्थी विनय वाबळे यांनी मेटारोल कंपनीचे आभार व्यक्त केले. स्वागत प्रा. डी. डी. कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन श्रृती फदाले यांनी, तर आरती काळे यांनी आभार मानले.
-----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.