बाजार समिती निवडणुकीसाठी मतदारयादी सुधारणा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती निवडणुकीसाठी 
मतदारयादी सुधारणा कार्यक्रम
बाजार समिती निवडणुकीसाठी मतदारयादी सुधारणा कार्यक्रम

बाजार समिती निवडणुकीसाठी मतदारयादी सुधारणा कार्यक्रम

sakal_logo
By

जुन्नर, ता. ९ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी सुधारणा कार्यक्रम शुक्रवारपासून (ता. १०) सुरू होत आहे. त्यासाठी १ सप्टेंबर २२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर बाजार समितीचे सचिव रूपेश कवडे यांनी दिली.
बाजार समितीच्या अंतिम मतदार यादीत १० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत ही नावे समाविष्ट करून सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी सुधारित प्रारूप मतदार यादी २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करतील. या प्रारूप मतदार यादीवर २७ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आक्षेप किंवा हरकती नोंदविता येणार आहेत. आक्षेप व हरकतींवर ८ ते १७ मार्च या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील यानंतर सुधारित अंतिम मतदार यादी २० एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या १ सप्टेंबर २२ या तारखेवर निश्चित केल्या होत्या. त्यानंतरही ग्रामपंचायत व प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन सदस्यांची निवड झाली. नव्याने निवडून आलेले सदस्य बाजार समितीच्या निवडणुकीला पात्र झाले असल्याने अंतिम मतदार यादीत सदोष झाली होती. अंतिम मतदार यादीत जास्तीत जास्त पात्र सदस्यांचा समावेश व्हावा, यासाठी नव्याने निवडून आलेले प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था सदस्य, बहुउद्देशीय सहकारी संस्था सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांचा अंतिम मतदार यादी समावेश करण्यासाठी अंतिम मतदार यादी सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.