सावरगाव येथील शिबीरात तीनशे जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरगाव येथील शिबीरात 
तीनशे जणांची तपासणी
सावरगाव येथील शिबीरात तीनशे जणांची तपासणी

सावरगाव येथील शिबीरात तीनशे जणांची तपासणी

sakal_logo
By

जुन्नर, ता. १० : सावरगाव (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व रोग निदान शिबिराचा ३१९ जणांनी लाभ घेतला. माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, परिसरातील विविध गावचे सरपंच दीपक बाळसराफ, वैशाली तांबोळी, मोहिनी घुले, माधुरी वऱ्हाडी, प्रकाश गिधे, गुलाब पाबळे आदींच्या उपस्थितीत धन्वंतरीचे पूजन व दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिरात खासगी वैद्यकीय व्यावसायिक स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रसाद शिंगोटे, डॉ. अमित पवार, बालरोग तज्ञ डॉ. सोहेल इनामदार, नीलेश डोके, आदींनी रुग्ण तपासणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.जाहिद जाफरी, डॉ.अक्षय जाधव, डॉ.अर्चना कर्पे, डॉ.विनोद ढवळे, दिलीप कचेरे आदींचे सहकार्य लाभले. यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय जाधव यांनी प्रास्ताविक केले. दिलीप कचेरे यांनी सूत्रसंचालन केले व आरोग्य सहाय्यक विजय दिवटे यांनी आभार मानले.