
शिवनेरी मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या धावपटूंची बाजी
जुन्नर, ता.१२ : शिवरायांचा जयघोष... ढोल तुतारीचा गजर... सळसळती तरुणाई... अन् मशालींनी उजळलेला शिवजन्मभूमीचा परिसरात पहाटेच्या बोचऱ्या थंडीच्या वातावरणात पहिल्या शिवनेरी मॅरेथॉनला रविवारी (ता.१२) जल्लोषात प्रारंभ झाला. इथोपियाच्या धावपटूंनी एक तासाच्या आत शर्यत पूर्ण करून या मॅरेथॉनमध्ये बाजी मारली. या मॅरेथॉनसाठी एक हजार २०० हून अधिक धावपटू जुन्नरला दाखल झाले होते.
आमदार अतुल बेनके, पोलिस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त सुनील थोरवे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, तहसीलदार रवींद्र सबनिस, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, चाईल्ड फंड इंडियाचे अभिजित मदने, कृषितज्ञ संतोष सहाणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत २१.१, १०,५ व ३ किलोमीटर गटांच्या मॅरेथॉनचा प्रारंभ करण्यात आला.
जुन्नर येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील ५५ विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. शिवनेरी मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले. २१ किलोमीटर गटात सुवर्णा दुधावडे प्रथम आली तर १० किलोमीटर गटात योगिता बांबळे द्वितीय क्रमांक मिळविला अश्विनी रेंगडे हिस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. अबालवृद्धधांचा उत्स्फूर्त सहभाग हे मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे : (२१.१ किलोमीटर गट) : पुरुष : प्रथम - यासीन अहमेदीन सुलतान (५८ मिनीट १९ सेकंद), द्वितीय - मल्ला मेंगेबू अलेम्न (१ तास ४५ सेकंद), तृतीय - डॅडी अब्राहम गेमेडा (१ तास ५० सेकंद).
महिला :- प्रथम - सुवर्णा बाळू दुधवडे (२ मिनीट २ मिनिटे ४४ सेकंद), द्वितीय - प्रीती नारायण (२ तास ५ मिनीट १४ सेकंद), तृतीय - दीपाली हरिभाऊ देवराये (२ तास १८ मिनिटे ४२ सेकंद).
दहा किलोमीटर गट : पुरुष : प्रथम - निकेतन कांदे (४३ मिनीट ५२ सेकंद), द्वितीय - सुदेश डोके (४३ मिनीट ५७ सेकंद), तृतीय - प्रतीक जाधव (४३ मिनिटे ५८ सेकंद).
महिला : प्रथम - कीर्ती रामदास तांबे (४९ मिनीट), द्वितीय - मयूरी एम उंडे (५६ मिनीट), तृतीय - सुमन प्रसाद (५९ मिनिटे १६ सेकंद)
...................
04929