Sat, March 25, 2023

दुरुस्ती करताना
वायरमनचा मृत्यू
दुरुस्ती करताना वायरमनचा मृत्यू
Published on : 17 February 2023, 3:28 am
जुन्नर, ता. १७ : पिंपळगाव सिद्धनाथ (ता. जुन्नर) येथे विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने स्थानिक सहायक वायरमनचा मृत्यू झाला.
सोमनाथ खंडागळे असे त्यांचे नाव असून, त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले होते व त्यांनी विद्युत वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. मृत खंडागळे यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून जोपर्यंत मदतीचे ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह खांबावरून खाली घेण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. मृत सोमनाथ खंडागळे यांच्या मागे पत्नी, एक अपंग मुलगा व एक मुलगी आहे. खांबावर अचानक सुरू झालेला विद्युत पुरवठा कसा झाला, याबाबत नागरिकांनी विचारणा केली. या घटनेबाबत विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.