आर्थिक फसवणूकप्रकरणी जुन्नरच्या माजी नगरसेवकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्थिक फसवणूकप्रकरणी 
जुन्नरच्या माजी नगरसेवकास अटक
आर्थिक फसवणूकप्रकरणी जुन्नरच्या माजी नगरसेवकास अटक

आर्थिक फसवणूकप्रकरणी जुन्नरच्या माजी नगरसेवकास अटक

sakal_logo
By

जुन्नर, ता. ५ : जुन्नरच्या माजी नगरसेवकासह एकाच्या विरोधात सुमारे ३० लाखाची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत पुनाजी कवठे (मूळ रा. कोपरे ता. जुन्नर, सध्या रा. धनकवडी पुणे) यांनी माजी नगरसेवक अविन विष्णू फुलपगार व अनिल वाल्मीकी (पूर्ण नाव माहीत नाही) राहणार जुन्नर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. यापैकी आरोपी फुलपगार यास पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
सप्टेंबर १५मध्ये फुलपगार व वाल्मीकी यांच्या समवेत कवठे यांची भेट झाली. यावेळी जुन्नरमधील शिवाजीनगर येथील नुरजहा बेगम इमाम अली सय्यद यांची मिळकत फुलपगार यांनी विकास करारनामा करून विकासाकरिता घेतल्याचे सांगितले. यासाठी तीस लाख रुपये आर्थिक सहाय्यची मागणी केली. बांधकामानंतर विक्री करून येणाऱ्या रकमेतून तीस लाख रुपये परत करू त्यावर ३९ लाख रुपये असे एकूण ६९ लाख रुपये देण्याचे ठरले होते. कवठे यांनी चेकने ही रक्कम दिली. परंतु, ठरल्याप्रमाणे एक वर्षाच्या आत ही जागा विकसित केली नसल्याचे लक्षात आल्याने पैशाची विचारणा केली असता त्यांनी आळेफाटा येथे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पैसे देतो असे सांगून वेळ घालवला. यावेळी फुलपगार यांनी दिलेले चेक वटले नाहीत. वारंवार पैसे मागून सुद्धा ते पैसे देत नसल्याने तसेच शिवीगाळ करून दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

.