Sat, March 25, 2023

जुन्नरला शेतकऱ्यांना विमा पॉलिसीचे वाटप
जुन्नरला शेतकऱ्यांना विमा पॉलिसीचे वाटप
Published on : 15 March 2023, 11:28 am
जुन्नर,ता.१५ : पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ''मेरी पॉलिसी मेरे हाथ'' अंतर्गत पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना पॉलिसी देण्यात आल्या, अशी माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी नंदकिशोर खेडकर यांनी सांगितले.
जुन्नर येथील तालुका कृषी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आंबा व डाळिंब उत्पादक शेतकरी भरत जाधव, रोहिणी जाधव, लक्ष्मण वाघुले यांना विमा पॉलिसी देण्यात आल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, कृषी अधिकारी बापूसाहेब रोकडे,कृषी पर्यवेक्षक दत्तात्रेय जाधव, सांखिकी तंत्र सहायक अनिता शिंदे , कृषी सहायक कावेरी गाडेकर, अमोल भालेकर आदी उपस्थित होते.