Thur, Sept 28, 2023

मद्यप्राशन केल्याप्रकरणी
दुचाकीचालकावर गुन्हा
मद्यप्राशन केल्याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा
Published on : 31 May 2023, 11:49 am
जुन्नर, ता. ३१ : जुन्नर-मढ रस्त्यावरील पिंपळगाव सिद्धनाथ चौक (ता. जुन्नर) येथे दारू पिऊन मोटार सायकल चालविणाऱ्या युवकाविरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिस कर्मचारी दीपक वणवे हे चौकात वाहतूक नियंत्रण करत असताना तुषार पोपट भांगे (सध्या रा. हनुमान कॉलनी, भोसरी) हा मोटरसायकल (क्र. एमएच-१२ सीएफ १४९५) वेडीवाकडी चालवीत असताना दिसून आला. त्याची ब्रेथ ऍनालायझर मशिनद्वारे तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.