Vighnahar Sugar Factory : 'विघ्नहर' देणार ३,०५० अंतिम भाव
जुन्नर - श्री विघ्नहर साखर कारखान्याने यंदा अंतिम भाव विना कपात ३,०५० रुपये देण्याचे निश्चित केले आहे. आत्तापर्यंत २,७५० प्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली आहे. उर्वरित ३०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम शुक्रवारी (ता. ३) खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कामगारांनाही १५ टक्के प्रमाणे बोनस, फरकाची रक्कम व इतर देणी दीपावलीपूर्वी अदा करणार आहे, अशी ग्वाही अध्यक्ष सत्यशील शेरकर दिली.
निवृत्तीनगर (ता. जुन्नर) येथे कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी (ता. १) येथे साध्या पद्धतीने करण्यात आला. सकल मराठा समाज समन्वयक व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मराठा आंदोलनाला पाठिंबा देत अध्यक्ष सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकली.
यावेळी कार्यकारी संचालक भास्कर घुले, सर्व संचालक, सकल मराठा समाज समन्वयक आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सभासद ऊस उत्पादक तसेच अधिकारी व कामगार उपस्थित होते. अरुण थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार तर कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी स्वागत केले.
''जास्तीत जास्त उसाची लागवड करावी''
यंदा गाळप हंगाम २०२३-२४ साठी सुमारे १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करणार असल्याचे शेरकर यांनी सांगितले. साखरेचे व इथेनॉलचे दर पुढील वर्षीही चांगले राहण्याची शक्यता आहे. यावर्षी तसेच पुढील वर्षीही उसाची लागवड वाढेल. त्याला चांगला बाजारभाव मिळेल. इतर शेतीमालाचे अनिश्चित असलेले बाजारभाव लक्षात घेता उसाला हक्काचा बाजारभाव मिळतो. तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाची लागवड करावी, असे आवाहन केले.
जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगले दर असले तरी निर्यात बंदी असल्याने कारखान्यांना लाभ घेता येत नाही. सर्व सामान्यांसाठी साखरेचे बाजारभाव वाढणार नाहीत याची दक्षता केंद्र सरकार घेत असल्याने साखर विक्रीवर अनेक निर्बंध आणले जातात. कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो, अशी तारेवरची कसरत करून साखर कारखानदारी चालवावी लागत आहे
- सत्यशील शेरकर, अध्यक्ष, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.