Adani Project : ‘अदानी’च्या प्रकल्पाबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी

आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाबाबत येथील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत.
adani project of green energy in ghatghar and anjanavale
adani project of green energy in ghatghar and anjanavaleSakal
Published on

जुन्नर : तालुक्याच्या आदिवासी भागातील घाटघर व अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाबाबत येथील नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. सरकारने त्यांच्या मनातील प्रकल्पाबाबतचा संभ्रम दूर करावा,

अशी मागणी विभागीय वनहक्क समिती सदस्य किरण लोहकरे यांनी राज्यपाल, तसेच आदिवासी विभागाचे प्रधान सचिव, पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.

दोनही गावच्या ग्रामसभांना सरकार, तसेच कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, तसेच पेसा कायद्यातील तरतुदीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याने हा प्रकल्प पूर्णपणे बेकायदेशीर आहे. लोकांना विश्वासात न घेता बेकायदा प्रकल्पाचे काम सुरू केल्याने आदिवासी भागात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

संविधानातील पाचव्या अनुसूची व पेसा कायदा २००६ मधील तरतुदीचा भंग करून जुन्नर तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या पंप स्टोरेज प्रकल्पास परवानगी दिली असल्याने ती तत्काळ रद्द करून कामे बंद करावीत, अशी मागणी केली आहे.
स्थानिकांना कंपनीकडून नेमके कोणते काम करण्यात येणार आहे, याची काहीच माहिती नाही.

नेमकी कोणती कंपनी पंप स्टोरेज प्रकल्पाचे काम करणार आहे, हे समजत नाही. प्रकल्पासाठी आदिवासी शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे का? प्रकल्प आराखडा नेमका कसा आहे? याबाबत स्थानिक नागरिक अनभिज्ञ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ghodegaon Integrated Tribal Development Project Gets New Project Officer
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Pune
Thalapathy Vijay Tamil Nadu smart meter project cancel
Marathi News Esakal
www.esakal.com