समस्येवर मार्ग काढण्याची 
उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

समस्येवर मार्ग काढण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

जुन्नर, ता. १० : जुन्नर तालुक्यात बिबट हल्ल्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तसेच, पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना दिवसा थ्री-फेज लाइट मिळावी व माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण करावे, अशी मागणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे येथील भेटीत केली.
माजी आमदार सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सकारात्मक आश्वासन पवार यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्नरबरोबर आंबेगाव, खेड व शिरूर या तालुक्यात देखील बिबट समस्या असून, येथील शेतकरी बांधवांना दिवसा थ्री-फेज वीज देऊन दिलासा द्यावा, मानवावर बिबट हल्ल्याच्या घटना वाढत आहे, यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरणाबाबत कार्यवाही व्हावी. तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावरील गावे व वाड्या वस्त्यांना पाणी पुरविण्यासाठी धोरण व प्रकल्पात समाविष्ट करून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल, यासाठी ७४ लाखाचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com