जुन्नरमधील दिव्यांगांच्या
बँक खात्यात निधी जमा

जुन्नरमधील दिव्यांगांच्या बँक खात्यात निधी जमा

Published on

जुन्नर, ता. ११ : जुन्नर शहरातील २०६ दिव्यांगांच्या बँक खात्यावर जुन्नर नगरपालिकेच्या वतीने पाच टक्के दिव्यांग निधी जमा केला आहे.

नगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना पाच टक्के निधी मिळावा, यासाठी आमदार बच्चू कडू, राज्य समन्वयक गौरव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार रुग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्रांच्यावतीने नगरपालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरवठा केला.
जुन्नर शहरातील एकूण २३७ दिव्यांगांनी अर्ज दाखल केले होते. नगरपालिका दिव्यांग कक्ष अधिकारी चित्रा औटी यांनी अर्जाची छाननी करून दिव्यांगांच्या ऑनलाइन प्रमाण पत्राची तपासणी करून २०६ लाभार्थ्यांची निवड केली. या सर्वांच्या खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये याप्रमाणे एकूण बारा लाख छत्तीस हजार रुपये जमा केले आहेत. मुख्याधिकारी संदीप भोळे, जिल्हा परिषदेचे दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे, चित्रा औटी यांचे यासाठी सहकार्य झाल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले.

जुन्नर शहरातील दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच घरपट्टीत सवलत आदी अडचणी सोडविण्यासाठी लवकरच नगरपालिकेत बैठक घेण्यात येईल, असे मुख्याधिकारी भोळे यांनी संघटनेच्या शिष्टमंडळास सांगितले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अरुण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनील जंगम, प्रताप मालेगावकर, स्वप्निल लांडे, दत्तात्रेय उनकुले, विलास जंगम, गोरक्ष नरवीर, अमर चावरे आदी उपस्थित होते. अरुण शेरकर यांनी नगरपालिका प्रशासनाने आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.