आदिवासी भागात इंद्रायणी, आंबेमोहोरचा दरवळ

आदिवासी भागात इंद्रायणी, आंबेमोहोरचा दरवळ

Published on

जुन्नर, ता.२९ : जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागातील भातपीक फुलोऱ्यात आले असून इंद्रायणी, रायभोग, आंबेमोहोर भाताच्या सुवासाने शिवार दरवळले आहे. जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात झालेला परतीचा पाऊस भातशेतीला उपयुक्त ठरला आहे. यावर्षी लवकर पाऊस सुरू झाला.आदिवासी भागात भातपीक हेच शेतकऱ्यांचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे. पावसाने अद्याप दडी मारलेली नसल्याने यावर्षी भातपीक दमदार स्थितीत आहे.
तालुक्यात सुमारे १३ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. शेतकरी पारंपरिक वाणाबरोबर संकरित वाणांची देखील लागवड करतात. इंद्रायणी, रायभोग, आंबेमोहोर, कोळंबा, झिनी कोलम, काळभात, तामकुड या वाणाबरोबर सह्याद्री, दप्तरी, बासमती इत्यादी संकरित वाणांची लागवड केली जाते. चारसुत्री पद्धतीने भात लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामुळे भात उत्पादन वाढण्यास मदत होते.
खत व तण व्यवस्थापन करणे सोपे जात असल्याचे सांगण्यात आले. सद्या दिवसेंदिवस वाढती मजुरी, खते, महागडी बियाणे यामुळे भातशेती परवडेनासी झाली असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. हळवे भातपीक पूर्णपणे फुलोऱ्यात त र इंद्रायणी, आंबेमोहोर ही गरवी भातपिके पोटरा ते फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. अद्याप भात पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. परंतु पाऊस कोसळत राहिला तर भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हळवे भातपीक ८० ते ९० दिवसांत तर गरवे भातपीक १२० ते १३० दिवसांत कापणीस येते.

दोन काडीला सत्तर ते ऐंशी फुटवे
खटकाळे येथील प्रगतशील शेतकरी रावजी तळपे यांनी यावेळी विष्णुभोग (बासमती वाण) हे संकरित वाण, चारसुत्री पद्धतीने घेतले आहे. एक ते दोन काडीला सत्तर ते ऐंशी फुटवे आले आहेत. हे भातपीक पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी आवर्जून भेट देत आहेत.
09232

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com