इंगळूण ते आंबे- हातवीज घाटरस्त्यात कोसळली दरड

इंगळूण ते आंबे- हातवीज घाटरस्त्यात कोसळली दरड

Published on

जुन्नर, ता. २९ : जुन्नर तालुक्यातील इंगळूण ते आंबे- हातवीज घाटरस्त्यात मुसळधार पावसामुळे शनिवारी (ता. २७) रात्री दरड कोसळली. यंदाच्या पावसाळ्यात घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी जून व ऑगस्ट महिन्यात देखील दरड, माती, झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती.
हातवीजहून रविवारी (ता. २८) सकाळी जुन्नरला निघालेली एसटी बस दरड कोसळल्याने घाटातच अडकून राहिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा दूर केल्यानंतर रस्ता वाहतुकीस मोकळा झाला. डोंगरमाथ्यावर असणाऱ्या पठारावर सुकाळवेढे, पिंपरवाडी, आंबे, हातवीज, लेंभेवाडी, कोकणेवाडी आदी गावे व वाड्या- वस्त्यांवरील नागरिकांना दळणवळणाचा हा एकच मार्ग आहे. या मार्गावरील अडचणीबाबत पाचही गावच्या सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देऊन पावसाळ्यात घाटातील होणाऱ्या दुरवस्थेची दखल घ्यावी अशी विनंती केली होती.
पावसाळ्यात घडणाऱ्या घटनांमुळे घाटातील प्रवास धोक्याचा झाला असल्याचे हातवीजचे माजी पोलिस पाटील अनंता पारधी यांनी सांगितले.
पावसामुळे घाटात दगड कोसळल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी पाऊस जास्त असला तरी बांधकाम विभागाने केलेले घाटरस्ता रुंदीकरण चुकीच्या पद्धतीने केल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रुंदीकरण करताना पाणी वाहून जाण्यासाठी गटार वाहिनीचे बांधकाम केले नाही. आवश्यक तेथे मोऱ्या केल्या नाहीत, यामुळे संपूर्ण रस्त्यावरून पाणी वाहते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थी, दूध घरून जाणारे शेतकी यांना त्रास सोसावा लावतो. पाऊस थांबल्यावर घाटरस्ता तत्काळ व्यवस्थित करावा, अशी मागणी सुकाळवेढेचे सरपंच दत्ता गवारी यांनी केली आहे.

09265

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com